Site icon Manvadhikar Abhivyakti News

गोरेगाव पुर्व येथे टेक्निकप्लस या इमारतीमध्ये सातव्या मजल्यावरती आग लागली । —- रिपोर्ट – बीनू वर्गिस

सौ . (चित्र प्रतीकात्मक)

मुंबई – एस. व्ही. रोड, एम.टी.एन.एल. ऑफिस जवळ पवनबाग, गोरेगाव पुर्व येथे टेक्निकप्लस या इमारतीमध्ये सातव्या मजल्यावरती सायंकाळी 04.26 सुमारास आग लागली आहे. सदर ठिकाणी 05 वा.05 मि.लेवल 3 ची आग असल्याचे मुंबई अग्निशमन केंद्राकडुन जाहीर करण्यात आले आहे. सदर ठिकाणी मुंबई अग्निशमन केंद्राची 5 फायर इंजिन, 4 जम्बो टॅकर, 1 TTL, 1 APL, उपस्थित असुन आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सदर इमारतीमध्ये काही व्यक्ती अडकल्याची शक्यता मुंबई आ. व्य. केंद्रातुन वर्तवण्यात येत आहे.

Exit mobile version