Site icon Manvadhikar Abhivyakti News

उपोषण कर्त्याचा आरोप, 1991 पासून एसटी प्रशासनाची फसवणूक करणाऱ्या वादग्रस्त अधिकाऱ्याला बड़तर्फ करा, दिवाकर रावते पाठीशी घालत आहे ।

बुलढाणा -1991 पासून एसटी प्रशासनाची फसवणूक करुण लूट करणाऱ्या आगारप्रमुखास बड़तर्फ करा तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते अश्या वादग्रस्त अधिकाऱ्याला पाठीशी घालत असल्याचा ही आरोप उपोषण कर्त्यानी केला आहे, गेल्या पाच दिवसांपासून एसटी कर्मचार्यान्चे जिल्हा मुख्यालयी विभाग नियंत्रक अधिकारी कारीलायासमोर आमरण उपोषण सुरु आहे अद्यापपर्यंत बुलढाणा आगारप्रमुखावर कुठलीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे

1991 मद्धे एसटी महामंडळ मद्धे सध्या आगारप्रमुख म्हणून कार्यरत असलेले रविन्द्र खेडेकर यानी सहायक कार्यशाला अधीक्षक या पदावर नियुक्ति मिळविली होती , 1994 मद्धे खेडेकर यांचा अपघात होऊन 55 टक्के अपंगत्व आले होते दरम्यान एसटी मद्धे नोकरी करण्यासाठी अवजड वाहन चालविन्याचा परवाना आवश्यक असताना त्यानी खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडून 2005 मद्धे आरटीओ कडून अवजड वाहन चालविन्याचा परवाना मिळवला त्यावर नोकरी मद्धे बढ़त मिळविली ही बाब कर्मचार्यांच्या लक्षात येताच त्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली व त्यानुसार चौकाशिअन्ति अवजड वाहन चालविन्याचा परवाना रद्द करण्यात आला , तरीही 1998 पासून आजपर्यंत दिव्यांग भत्ता सर्रास पणे घेत असून आगारप्रमुख पदासाठी अवजड वाहन चालविन्याचा परवाना आवश्यक असताना तो परवाना पूर्वीच रद्द करण्यात आला आहे तरीही एसटी प्रशासनावर दबाव तंत्र वापरून माझे कोणीच वाकड़े करु शकत नाही या भ्रमात वावरत आगारप्रमुख म्हणून कार्यरत आहे
अश्या फसवणूक करणाऱ्या आगारप्रमुखावर तात्काळ बड़तर्फ करण्याची कार्रवाई करण्याची मागणी उपोषण कर्ते संदीप वानखेड़े व प्रमोद पोहरे यानी एसटी संचालक मुंबई यांच्याकडे केली आहे

बुलढाणा जिल्ह्यातील एसटी महामंडळ विभागात रविन्द्र खेडेकर यांच्या विरोधात असंख्य तक्रारी दाखल आहेत बऱ्याच ठिकाणी प्रशासकीय कार्रवाई सुद्धा झाली आहे तसेच बुलढाणा येथील एका एसटी महिला कर्मचारी ला लोटपात करीत जातिवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी बुलढाणा पोलिसात अक्ट्रोसिटी चा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे एवढ्या तक्रारी असताना एसटी प्रशासन खेडेकर यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप एसटी कर्मचारी करीत आहे

तसेच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे असंख्य तक्रारी देऊन सुद्धा अद्यापपर्यंत कार्रवाई नसल्याने शेवटी विदर्भ एसटी कामगार संघटनेच्या पदाधिकार्याणि आन्दोलनाचा मार्ग अवलंबित बुलढाणा येथील मुख्य विभागीय नियंत्रक अधिकारी कार्यलया समोर आमरण उपोषण सुरु केले आहे जोपर्यंत आगारप्रमुख रविन्द्र खेडेकर यांच्यावर बड़तर्फ ची कार्रवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुटनार नाही असा इशारा ही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे

Exit mobile version