Site icon Manvadhikar Abhivyakti News

बनावट नोटा पुरवणारी टोळी गजाआड । —- रिपोर्ट – बीनू वर्गिस

अकोला (महाराष्ट्र) – शहरात पाचशे रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीला पोलिसांच्या विशेष पथकाने आज शुक्रवारी दुपारी नवीन बस स्थानक परिसरात छापा टाकून अटक केली. त्यांच्या ताब्यातून अंदाजे २० ते २५ लाखांचे बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

शहरातील नवीन बसस्थानक परिसरात दोघे जण पाचशे व शंभर रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यावरून संशयित तीन आरोपीसह मोटर वाहन ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, पाचशे व शंभर रुपयांच्या अंदाजे २० ते २५ लाखांचे बनावट नोटा सापडल्या. या तिघांना अटक करून सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हि तिघेही यवतमाळ जिल्हातील दिग्रस परिसरातील रहिवासी आहे. ही कारवाई पोलिस पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांच्या यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.. या गुन्ह्यातं मोठं रॅकेट असल्याचे निष्पन्न होत असून हि टोळी खऱ्या (उदा.) पन्नास हजारांच्या बदल्यात एक लाख रुपयांच्या बनावट नोटा घेत असायचे. याप्रकरणी तिन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

Exit mobile version