Site icon Manvadhikar Abhivyakti News

महाभ्रष्ट मोहन संखे ला निलंबित का केले ?—————- हितेश जाधव (सामाजिक कार्यकर्ते )

वसई-विरार शहर महापालिकेच्या आस्थापनेवर साधा लिपीक असलेल्या व बोळींज प्रभाग समिती ‘अ’मध्ये फेब्रुवारी पासून कार्यरत असलेल्या मोहन्या  संखे याने अक्षरश: भ्रष्टाचाराचा कहर केला होता. तो पालिका कर्मचा-यांच्या सेवा ज्येष्ठता यादीतही बसत नाही. तरीही राजकीय आशिर्वादाने साध्या १२ वी शिकलेल्या लिपीकाला त्या खुर्चीवर बसविण्यात आले.

त्याच्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या असंख्य तक्रारीनंतर पालिका आयुक्तांनी त्याला सेवेतून निलंबित केले आहे. अगदी कोणाचेही एकूण पालिका आयुक्त निर्णय घेऊ शकतात का ? 

मोहन संखे यांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक कथा असून  स्वत:च्या प्रभाग समितीसह संपूर्ण वसई-विरारमधील अनधिकृत बांधकामे करणा-या अनेक बिल्डरांची ‘सेटींग’ करण्याचे काम मोहन करत होता. त्याच्या या भ्रष्ट कारभारामुळेच त्याला तात्काळ निलंबित करण्यात आले असून आता सर्व प्रकरणांची सविस्तर चौकशी पालिकेकडून केली जाणार आहे.

स्वत:ला सहानुभूती मिळविण्यासाठी समाजात चुकीची माहिती पसरविणा-या मोहनच्या कारनाम्यांची माहिती खालीलप्रमाणे – 

मोहन चा पारदर्शक कारभार अगदी थोडक्यात-

०१) प्रभाग समिती क्षेत्रात बोळींज, आगाशी, नारिंगी व इतर भागात उभ्या राहिलेल्या अनेक अनधिकृत इमारतींवर कोणतीही कारवाई न करता , बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल केले नाहीत. जुन्या इमारतींनाही धाक दाखवून बिल्डरांकडून लाखो रूपयांची वसुली.

०२) विरार पूर्व प्रभाग समिती सी फुलपाडा भागात अतिरिक्त कार्यभार असताना २० बिल्डरांना एमआरटीपीच्या नोटीसा दिल्या व गुन्हे दाखल न करण्यासाठी लाखो रूपयांची रक्कम जमा केली.

( त्या प्रभाग समितीच्या सध्याच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त व मोहनच्या नातेवाईक रुपाली संखे यांनी स्वत: याबाबत आयुक्तांकडे तक्रार केली होती )

०३) बोळींज  येथे एक चार मजली इमारत असून त्या इमारतीच्या बिल्डरला घाबरविण्यासाठी इमारतीच्या स्लॅबला दोन ड्रिल मारल्या व कारवाईची भीती दाखवून १० लाखांची मागणी केली. त्यातील साडेआठ लाख रूपये घेतले. योग्य वेळी तो बिल्डर माहिती जाहीर करणार आहे.

०४) विरारच्या नारंगी मूळ गावात चार मजली दोन इमारती असून त्याच्या एका इमारतीतून ४ लाख , एकाकडून दीड लाख घेतले

०५) आगाशी  नाक्यावर एका जुन्या इमारतीचा सज्जा कोसळला. धोकादायक इमारत म्हणून कारवाई करू नये व त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करू नये म्हणून २ लाखांची रक्कम मालकाकडून घेतली.

०६) विरार मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या अनधिकृत गोडाऊनकडून वसुली. एकाकडून एक लाख २५ हजार घेतले, दोन गोडाऊन आहेत दोन लाख ७५ हजार रूपयांची वसुली कसमिती

०७) स्वत:च्या प्रभाग समिती सोबतच पेल्हार, चंदनसार या इतर प्रभाग समिती हद्दीतील अनधिकृत बांधकामे करणा-यांची सेटींग त्या-त्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांसोबत करून दिली व लाखो रूपयांची रक्कम घेतली.

०८ ) विरार हायवेजवळ ३५ हजार फुटांची  गोडाऊन असून त्याला चुकीची नोटीस देऊन त्याच्याकडून २५ लाख रूपयांची वसुली. ( सर्वे नंबरसह माहिती आयुक्तांना सादर केली आहे )

०९ ) पेल्हार रशीद कंपाउंड  येथे सुरू असलेल्या अनेक अनधिकृत गोडाऊन मालकांकडून प्रत्येकी लाखो रूपयांची वसुली केली. अशी असंख्ये उदाहरणे असून त्याबाबत सविस्तर  माहिती मिळाल्याने व प्राथमिक चौकशीत मोहन दोषी आढळल्याने आयुक्तांनी त्याला निलंबित केले आहे.

१०) प्रभाग समिती कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांची कामे न करता दिवसभर फक्त दलाली व पैशाच्या मागे लागल्यामुळेच तो आपल्या कर्माने गेला आहे. त्याने चांगुलपणाचा आव आणू नये. चांगले कर्म केले असते तर आज निलंबनाची वेळ आली नसती.

मोहन संखे यांच्यात नैतिकता (ती नाहीच आहे) असेल तर त्यांनी वरील सर्व माहिती खोटी आहे व आपण एकही पैसा घेतला नाही असे जाहीर करावे.

आज इतकेच…

(लवकरच स्मिता भोईर, प्रेमसिंग जाधव  व इतरांचीही माहिती जाहीर करणार आहोत )

Exit mobile version