Site icon Manvadhikar Abhivyakti News

शेतीला दिवसा किमान १२ तास लाईट द्यावी ही विनंती -आपला एक  आशावादी शेतकरी ।

मानवाधिकार अभिव्यक्ति, आपकी अभिव्यक्ति !

मा. मुख्यमंत्री साहेब,
मी खेडेगावातील रहीवासी असुन शेती व्यवसाय करतो साहेब,
विद्युत मंडाळा कडुन रात्री 10:30 ते सकाळी 6:30पर्यंत लाईट दिली जाते.
दिवसभर शेतात काम करून रात्री पाणी भरण्यासाठी रात्रभर शेतात ऊभे रहावे लागते सध्या थंडीचा महीना असुन ८ते १० डिग्री तापमान असते.
शेतकऱ्या बदल सरकारला एवढी चीड का आहे?
_आम्ही रात्रभर का जागं राहायचं?_
ज्या कोणी हा निर्णय घेतला असेन तो अाम्हाला वैरी समजत असावा आणि रात्री शेतीला विज देता रात्री वीज डी.पी वरील फ्यूज गेला तर तो टाकण्यासाठी मंडळाने रात्रीचे कर्मचारी दिलेले नसतात.
आम्हा शेतकर्यांना जिव धोक्यात घालून फ्युज टाकावे लागतात.
येवढं करून आमच्या हातात काय पडतय?????
आम्हाला वाटलं ५७ वर्ष वाटोळं झालं अाता नवं सरकार आलं चांगले दिवस येतील पण घरातील मोठे माणसे सांगत होते काहीच फरक पडणार नाही,तरी आमची कोणाकडूनही अपेक्षा राहीली नाही पण जमते का बघा…..
आहो साहेब रात्री घरातुन बाहेर निघालो तर आई म्हणते भाऊ बुट घातले का?
बायको टॉर्च देते, वडील म्हणतात काठी घेतली का?
मी येतो तुझ्या बरोबर…. _रात्री साप, विंचु , बिबट्या_ सारखे संकटे असतात,
मी शेतात अंधारात असतांना त्यांना झोप लागत असेल काहाे???
मी तुमच्या कडे फार मोठी मागनी करत नाही सहज शक्य आहे फक्त शेतीला दिवसा किमान १२ तास लाईट द्यावी ही विनंती??

Exit mobile version