29 C
Mumbai
Saturday, December 3, 2022

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

​ती शाळकरी मुलं ‘झिंदाबाद’ आणि धूर्त राजकारणी ‘मुर्दाबाद’…           – अॅड. विजय कुर्ले, शरद यादव

फटाकाबंदीच्या मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुद्दामहून आम्ही काही वस्त्यांमध्ये गस्त घातली. या फटाका बंदीवरुन काही धूर्त राजकीय नेत्यांनी केलेलं गलिच्छ भावनेचं राजकारण पाहता, या भ्रमंती दरम्यान छोट्या, छोट्या शाळकरी बालकांच्या समजूतदारीच्या अनूभवाने मात्र आम्ही पुर्णपणे भारावून गेलो. 

    आपला परिसर आणि शहर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी स्वयंस्फुर्तीने मोठ्या आवाजांच्या फटाक्यांवर बहिष्कार टाकणार्या या कुमारवयीन मुलांनी एक समजूतदारपणाच दाखवीला नाही, तर फटाक्यांवरुन भावनेचं गलिच्छ राजकारण करणार्या त्या प्रत्येक राजकीय नेत्यांच्या कानाखालीही सणसणीत चपराक मारण्याचं काम याच मुलांनी केलं आहे.

     लबाड राजकारणी सद्या कितीही उद्दाम आणि बेजबाबदारपणे वागत असले तरी, या मुलांना अनुभवल्यानंतर मात्र *’मेरा देश जरुर बदलेगा’* ची भावना जागृत होऊन ती अधिक प्रबळ होते व समाजपरिवर्तनाचं काम पुढे नेण्यासाठी आमचे मनोबल अधिक उंचावते.

     अशाप्रकारचा समजूतदारपणा दाखवणारी ती सर्व मुलं ‘झिंदाबाद’ आणि भावनेचं गलिच्छ राजकारण करणारे ते सर्व लबाड राजकीय नेते ‘मुर्दाबाद’.

– अॅड. विजय कुर्ले, शरद यादव
संयोजक,

राष्ट्रीय मुलभूत अधिकार कार्यकर्ता परिषद.

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here