28 C
Mumbai
Thursday, July 7, 2022

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

ठाणे शहराला पुढील ८ दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार !

ठाणे शहराला पुढील ८ दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. ठाणे आणि मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करण्याकरिता पिसे येते भातसा नदीवर बांधण्यात आलेल्या बंधा-यातील पाण्याची पातळी वाढवण्याकरिता तसंच वार्षिक देखभाल आणि दुरूस्तीचं काम चालू असल्यानं बंधा-यातील पाण्याची पातळी कमी करण्यात आली आहे. यामुळं पुढील ८ दिवस ठाणे शहराला कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. पिसे येथे भातसा नदीवर बंधारा बांधण्यात आला असून या बंधा-यातून अशुध्द पाण्याचा पुरवठा महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रात येतो. या बंधा-याची वार्षिक देखभाल आणि दुरूस्ती सुरू असल्यानं पुढील ८ दिवस ठाणे शहराला कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे. यामुळं ठाणेकरांनी पाण्याचा योग्य तो वापर करून सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here