निषेध…निषेध… तीव्र निषेध….
कल्याणचे तरुण पत्रकार व राष्ट्र सेवा दलाचे हितचिंतक केतन बेटावदकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा ऑल जर्नालिस्टस अँड फ्रेंड्स सर्कल मुंबई आणि ”मानवाघिकार अभिव्यक्ति ” च्या वतीने , तीव्र निषेध करीत आहे.
कल्याण येथील होली क्रॉस हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला तेव्हा हॉस्पिटलची मोडतोड करणाऱ्या जमावाचे केतन चित्रीकरण करीत होता.तेव्हा त्या जमावाने केतनवर हल्ला करून त्याला जबरी मारहाण केली सध्या केतन खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.
कल्याण मधील जेष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर यांचा केतन हा पुतण्या आहे. हल्लेखोरांना तात्काळ अटक करन कठोर शासन झालेच पाहिजे तसच केतन बेटावदकर यांचा उपचाराचा खर्च शासनाने करावं अशी मागणी करीत आहोत.
ऑल जर्नालिस्टस अँड फ्रेंड्स सर्कल मुंबई
– अध्यक्ष
निसार अली