आज दि. २७/११/१७ रोजी पत्रकारांना पनवेल महानगरपालिके मध्ये पुरोगामी पत्रकार संघ महाराष्ट्र तर्फे पत्रकार कक्ष देण्यात यावी या साठी निवेदन देण्यात आले.
सध्या पनवेल महानगरपालिकेत पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष नसून पनवेल मधील सर्व पत्रकाराना खूप वेळ महानगरपालिका संबंधित कारभारा विषयी माहिती घेण्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे, त्यावर पुरोगामी पत्रकार संघा कडे तक्रार आल्यावर संघाकडून पनवेल महानगरपालिका यांस तात्काळ निवेदन देण्यात आले.
पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे तसेच पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व गटनेते मा. श्री. परेश ठाकूर यांना निवेदन देण्यात आले. तसेच महानगरपालिकेच्या येणाऱ्या सर्व साधारण सभेत यांवर नक्की तोडगा काढू असे आश्वासन गट नेते श्री. परेश ठाकूर यांनी दिले.