25 C
Mumbai
Wednesday, November 29, 2023

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमध्ये गोंडस बाळाचा जन्म । —– रिपोर्ट – प्रमोद कुमार

कल्याण -डोंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान लोकल ट्रेनमध्ये एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. नाशिकमध्ये राहणारी रुपाली आंबेकर ही महिला गरोदर असल्याने ती कल्याण पूर्वेतील वालधुनी येथे आपल्या माहेरी आली आहे.गुरुवारी रात्री तिला प्रसूती वेदना होऊ लागल्याने रात्री ९ च्या सुमारास तिचे वडील तिला डोंबिवलीतील केडीएमसीच्या  शास्त्रीनगर रुग्णालयात घेऊन जाण्यास निघाले. त्यासाठी त्यांनी कल्याण स्थानकातून ९ वाजून २० मिनीटांनी लोकल पकडली. मात्र ट्रेनने कल्याण स्थानक सोडताच रुपालीच्या प्रसूतीवेदना वाढल्या आणि काही क्षणातच तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. या प्रकाराची माहिती रेलवे पोलिसांना मिळताच त्यांनी मदतीसाठी ट्रेनमध्ये धाव घेत रुपालीसह तिच्या बाळाला शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुपाली आणि तिचे बाळ दोघेही सुखरूप असून तिला रुग्णालयात नेणारे रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल के.व्ही.राजपूत व डी.एल.जगदाळे या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here