Site icon Manvadhikar Abhivyakti News

PSI लिगाडेंची कॉलर पकडणाऱ्या नगरसेवकाला सोलापूरचे आयुक्त तडीपार करणार। —- रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस

पोलिस अधिकारी दत्तात्रय लिगाडे यांची गच्ची पकडल्याची घटना गंभीर आहे. नगरसेवक हत्तुरे व साथीदारांचे गुन्ह्यांचे रेकॉर्ड जमवून तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे. – महादेव तांबडे, पोलिस आयुक्त 

सोलापूर : विनयभंगाच्या गुन्ह्यातील टवाळखोर तरुणांना सोडवण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांच्या शर्टाची कॉलर पकडणाऱ्या कॉंग्रेस नगरसेवक तौफिक हत्तुरे आणि त्याच्या साथीदाराचे रेकॉर्ड पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार काढण्यात येत आहे. हत्तुरे व त्याच्या साथीदारांना तडीपार करण्यात येणार आहे.

सोमवारी रात्री बेगमपेठ परिसरात टवाळखोर तरुणांनी दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीची छेड काढली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघा टवाळखोर तरुणांना ताब्यात घेतले. नगरसेवक हत्तुरे बेगमपेठ पोलिस चौकीत पोचले. “तू मुझे पहचानता नही क्‍या, मै यहा का नगरसेवक हू.. हमारे बच्चे को छोड दो’ असे म्हणून वाद घातला. संशयित आरोपी असलेल्या सलमान व रईस या दोघांना बाहेर नेण्याचा प्रयत्न केला.
पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे यांना शिवीगाळ करून गच्ची पकडली. याप्रकरणात नगरसेवक तौफिक हत्तुरे, अझरुद्दीन हत्तुरे, मोहसीन मैंदर्गीकर, बाबा ऊर्फ कॅडो या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. यात नगरसेवक हत्तुरे व साथीदार अजरोद्दीन या दोघांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
या प्रकरणात नगरसेवक तौफिक हत्तुरेवर गुन्हा दाखल करण्यात येऊ नये यासाठी कॉंग्रेस नगरसेवकांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांची गच्ची पकडून वर्दीचा अपमान करणाऱ्यांना माफी देता येणार नाही, अशी भूमिका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतली.

Exit mobile version