Site icon Manvadhikar Abhivyakti News

कल्याण पूर्वेतील दोन सेना नगरसेविकेंच्या कोळसेवाडी पोलिस ठाण्यात एकमेकींविरोधात तक्रारी दाखल…. – प्रमोद कुमार

बॅनर लावण्याच्या क्षुल्लक कारणावरुन शिवसेनेच्या दोन नगरसेविकांमध्ये राडा झाल्याची घटना रविवारी रात्री कल्याण पूर्वेत घडली.
या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कल्याण पूर्वेत शीतल मंढारी आणि माधुरी काळे या अनुक्रमे प्रभाग क्र. ९८ आणि ९९ च्या शिवसेनेच्या नगरसेविका आहेत. त्यात माधुरी काळे यांच्या कार्यकर्त्यांनी शितल मंढारी यांच्या प्रभागात मागच्या टर्ममध्ये झालेल्या कामाचा बॅनर एका सोसायटीत लावला . याबाबत या दोघींमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचं पर्यवसान हाणामारीत झालं.
हा वाद विकोपाला जावून पोलिस ठाण्यात गेल्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी रात्री उशिरा नगरसेविका माधुरी काळे यांच्याविरोधात अॅट्रोसिटी आणि मारहाणीचा, तर नगरसेविका मंढारी आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या विरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता या प्रकरणात पोलिसांची काय भूमिका असणार आहे या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून दोन्ही नगरसेविकांनी एकमेकांवर आरोप केले आहेत.
माधुरी काळे यांनी गेल्या निवडणूकीत शिवसेनेत प्रवेश करतांनाच त्यांच्याच पुर्वाश्रमच्या कार्यककत्या असलेल्या शितल मंढारी यांनाही शिवसेनेत प्रवेश देऊन निवडणून आणले होते .
एकेकाळी जिवलग मैत्रीणी असलेल्या एकाच पक्षाच्या या दोन नगरसेविका विकास कामाच्या श्रेयावरुन आता भर रस्त्यात हाणामारीवर आल्या असून थेट पोलिस ठाण्यात एकमेकिंविरोधात तक्रारी करीत असल्याने परिसरात हा चर्चचा विशष झाला आहे.

Exit mobile version