रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस
काल १९ तारखेला रात्री उशिरा आणखी एक धक्कादायक प्रकार घडला बदलापुर डँम रोड पिंपळवली गावात रस्त्यावर एक नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या रडण्याचाआवाज तेथील एका शाळेतील सुरक्षा रक्षकाला आला त्याने त्वरित तेथील पोलीस पाटलाला कळवलं त्यांनी बदलापूर पोलीस स्टेशन ला माहिती दिली पोलीस येऊन त्या मुलीला बदलापूर शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले ते बाळ मुलगी असून बाळाची तब्यात व्यवस्थित आहे.
रस्त्यावर टाकल्यामुळे गालावर खरचटलं आहे त्या व्यतिरिक्त तब्यत व्यवस्थित आहे.
सध्या बाळाला पुढील उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे व त्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे.
शिवाजी रगडे यांनी बाळाला भेट देऊन बाळा संदर्भात विचारपूस केली व काही मदत लागल्यास सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.