32 C
Mumbai
Wednesday, February 28, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

कोर्टात आरोपींना बोगस जमीनदार देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश । —- रिपोर्ट – बीनू वर्गिस

कल्याण (ठाणे) – पैसे घेउन आरोपींना बोगस जामीन पुरवणाऱ्या सहा जणांच्या टोळीला ठाणे क्राईम ब्रांच यूनिट 4 उल्हासनगरने रंगेहाथ पकडले आहे , गुन्हे शाखा उल्हासनगर यूनिटला काही इसम आरोपींना कोर्टात बोगस जामिनदार देणार असल्याची गुप्त माहीती मिळाली , त्या प्रमाणे तारीख 3/07/2018 रोजी 12:10 च्या वेळेला तीन संशयित कल्याण कोर्टात आले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यांच्या कडे विचारपूस केली असता त्यांनी बनावट रेशनिंग कार्ड , ग्रामपंचायत कर पावती तयार करून आरोपींना जामीन देण्यासाठी तयारी केल्याचे सांगीतले , तसेच त्यांनी सुमारे एक वर्षापासून जवळपास 125 ते 150 आरोपींना कल्याण , उल्हासनगर तसेच ठाणे येथील कोर्टातुन जामीन करून न्यायालयाची फसवणूक केली आहे , त्यावरून महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे कलम 419,420,462,468,71,472,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला व एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली , या आरोपींकडून बनावट 45 रबरी स्टँम्प 51 बनावट रेशनिंग कार्ड , 318 ग्रामपंचायत कर पावत्या , बनावट आधार कार्ड व इतर संशयित कागदपत्रे जप्त केलेली आहेत, ह्यातील आरोपी मुख्य आरोपी बनावट दस्तऐवज तयार करण्यात सराईत असुन तो या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आहे , अटक आरोपी हे जामिनदारास पैशाचे प्रलोभन दाखवुन त्यांच्या पँनकार्डच्या आधारे रेशनिंग कार्डावर कुटुंब प्रमुख म्हणुन त्याचे नाव लिहुन संबंधित कार्यालयातील सर्व शिक्के मारून हुबेहूब रेशनिंग कार्ड तयार करून , संबंधित ग्रामपंचायतीची बनावट कर पावती बोगस जामीनदार तयार करून कागदपत्रासह कोर्टात उभे करून जामीन करून देत असत , काही प्रसंगी आरोपींनी बनावट आधार कार्ड काढुन त्या आधारे बनावट रेशनिंग कार्ड व ग्रामपंचायत कर पावती तयार करून आरोपींना जामीन केल्याचे निष्पन्न झाले आहे , हे आरोपी बनावट रेशनकार्ड तयार करण्यासाठी भिवंडी येथील एका झेरॉक्स सेंटरची मदत घेत होते , ग्रामपंचायत नमुना नंबर 10 कर पावत्या ह्या उल्हासनगर येथील एका प्रिंटिंग प्रेस मधुन छापून घेत असत , तसेच त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले 45 रबरी शिक्के हे सोलापूर येथुन तयार केल्याचे तपासात उघड झाले आहे , तसेच ज्या ज्या कोर्टात बोगस जामीनदारानी बनावट कागदपत्रांच्या आधारे कोर्टात उभे राहुन आरोपींना जामीन केला आहे अशा व्यक्तीचा शोध घेण्यात येणार आहे , या गुन्ह्याची व्याप्ती पहाता अजुन काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे , पुढील तपास उल्हासनगर युनिट 4 चे पोलीस निरीक्षक मनोहर पाटील करत आहेत .

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »