34 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

मुंबई , ठाणे , पुणे ब्रेकिंग न्यूज —- रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस

मुंबई – वसई स्टेला माणिकपूर येथील ” आमचो कोळिवाडो” हॉटेलला लागली आग.

https://manvadhikarabhivyakti.com/wp-content/uploads/2018/08/img-20180828-wa0001.jpg
ठाणे – शहरातील खड्डे भरण्याची कार्यवाही युध्दपातळीवर, आयुक्त श्री .जयस्वाल यांनी केली पाहणी.

ठाणे(27): ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्तावरील खड्डे भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून आज महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रत्यक्षस्थळी जावून या कामाची पाहणी केली. दरम्यान शहरातील उर्वरित खड्डे तात्काळ भरण्याची कार्यवाही करण्याचे आदेश श्री. जयस्वाल यांनी यावेळी बांधकाम विभागाला दिले.

ठाणे शहरात होणारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २०१८ आणि काही दिवसावर येवून ठेपलेल्या सार्वजनिक गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी शहरातील खड्डे तात्काळ भरण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहरातील खड्डे भरण्यात आले असून या कामाची महापालिका आयुक्तांनी आज पाहणी केली.

यावेळी शहरातील कोरस रोड, यशोधन नगर,लोकमान्य नगर, म्हाडा वसाहत आदी ठिकाणी आयुक्त श्री.जयस्वाल यांनी खड्डे भरणीच्या कमाची पाहणी केली.

ठाणे महापालिका हद्दीतील कोपरी नौपाडा,उथळसर,दिवा,मुंब्रा,कळवा,माजिवडा-मानपाडा,वर्तकनगर,लोकमान्य सावरकर आणि वागळे या ठिकाणी ६६०८ चौ.मी.क्षेत्रफळाच्या सुमारे २३७४ खड्यापैकी आज रोजी ५९९० चौ.मी क्षेत्रफळाचे सुमारे २१२२ खड्डे भरण्यात आले आहेत.तर उर्वरित खड्डे तात्काळ भरण्यात येणार आहेत.

यावेळी त्यांच्यासोबत नगर अभियंता अनिल पाटील, उप आयुक्त संदीप माळवी, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, रामदास शिंदे आदी उपस्थित होते.

ब्रेकींग न्यूज –
पुणेः मुंबईतील तरुणीला शिक्षणासाठी मदत करण्याच्या बाहण्याने पुण्यात घेऊन आल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर. दत्तवाडी पोलिसांनी केली अटक.

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »