Site icon Manvadhikar Abhivyakti News

मानवाधिकार अभिव्यिक्त, आपकी अभिव्यक्ति । ——— द्वारा अभिजीत राणे

अभिजीत राणे लिहितात :
मनसेने फेरीवाल्यांविरूद्ध आंदोलने करण्यापेक्षा त्यांच्या कडून खरेदी करणा-या ग्राहकांना बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले पाहिजे. फेरीवाल्यांची समस्या ग्राहकांनी निर्माण केली आहे याबद्दल ग्राहकांना आधी समज, प्रबोधन आणि शेवटी त्यांच्या देखील कानफडात मारण्याचा मार्ग मनसेने स्वीकारला तर फेरीवाले आपोआप नाहीसे होतील.

अभिजीत राणे लिहितात :
मनसेच्या फेरीवाले हटाव मोहीमे बरोबरच अधिकृत दुकानदार त्यांच्या प्रवेशद्वारापाशी जे पुतळे, कपडे , वस्तू ठेवून अनधिकृत वापर करून आक्रमण करून पादचारी मार्गात अडथळे उभे करतात त्या विरोधात मनसे आणि महापालिकांनी कारवाई करायला हवी आहे.

अभिजीत राणे लिहितात :
पतंगराव कदम यांनी राजकीय संन्यास घेतलाआहे असे म्हणतात. विश्वजीत कदम भाजपा मध्ये जाणार आहेत आणि जन्मभर काँग्रेस मध्ये मंत्री पदे भोगल्यावर आता पक्ष बदलण्यापेक्षा राजकीय संन्यास घेतलेला बरा म्हणून पतंगराव कदम निवृत्त झाले आहेत असे म्हणतात.

अभिजीत राणे लिहितात :
दिवाळी अंकांसह फराळ आणि भेट वस्तू देण्याची शिवसेना “कोहिनूर ” मनोहर जोशी यांनी गेली पन्नास वर्षे चालविलेली परंपरा यंदाच्या दिवाळीत प्रथमच खंडित झाली. उन्मेश मनोहर जोशी यांच्या दिवाळे निघाल्याच्या बातम्या गेले काही दिवस येत आहेत या पार्श्वभूमीवर मनोहर जोशी यांच्या कडून न आलेली दिवाळी भेट मनाला चटका लावणारी आणि खिन्न उदास करणारी वाटली. कोहिनूर हिरा असो वा संस्था – ती शापित असते हा समज पुन्हा एकदा खरा ठरला काय?

www.mumbaimitra.com

Exit mobile version