30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

ठाणे महापालिका : जोरदार अतिवृष्टीच्या धर्तीवर आयुक्तांनी घेतली विशेष बैठक । —- रवि जी. निगम

९,१०,११ जूनला मुख्यालय न सोडण्याचे आयुक्तांचे आदेश, जोरदार अतिवृष्टीच्या धर्तीवर आयुक्तांनी घेतली विशेष बैठक: सर्व यंत्रणा सुसज्ज ठेवण्याच्या सूचना ।

ठाणे (५) स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्याने येत्या ९ ते ११ जून कालावधीत अतिवृष्टीचा दिलेल्या इशा-याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विशेष बैठक घेवून अधिका-यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले असून कुठल्याही अधिका-यांनी मुख्यालय न सोडण्याचा इशारा त्यांना दिला आहे. दरम्यान दिनांक ८ जून पर्यंत सर्व यंत्रणा अद्ययावत करण्याच्या सूचना त्यांनी सर्व अधिका-यांना दिल्या असून या कालावधीत १८ वरिष्ठ अधिका-यांना तैनात करण्यात येणार आहेत.
येत्या 8 ते 10 जून रोजी जलप्रलयाचे संकट ओढावणार  असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी सर्तक राहण्याच्या सुचना ठाणो महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबधींत विभागाला दिल्या आहेत.  या कालावधीत पालिकेतील सर्व कनिष्ठ तथा वरीष्ठ अधिका:यांनी मुख्यालय सोडू नये, तसेच या कालावधीत सर्व अधिकारी कर्मचा:यांच्या साप्ताहीक सुटय़ा रद्द करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, या काळात नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सोई सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्तक राहण्याच्या सुचना देखील दिल्या आहेत.

https://manvadhikarabhivyakti.com/wp-content/uploads/2018/05/img_20180529_134443.jpg

मुंबईसह इतर भागात येत्या 8 ते 10 जून रोजी जोरदार पावसाच्या सरी बसणार आहेत. कदाचित 26 जुलै 2005 ची परिस्थिती देखील यामुळे ओढावू शकणार आहे. त्यामुळे या कालावधीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सर्तक तर रहावेच शिवाय ठाणोकर नागरीकांनी देखील या कालावधीत गरज असले किंवा हवामानाचा अंदाज घेऊनच बाहेर पडावे अशा सुचना त्यांनी केल्या आहेत. या संदर्भात आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला महापालिकेतील सर्व वरीष्ठ अधिकारी तसेच आपत्तकालीन विभागाचे प्रमुख, अग्निशमन विभागाचे प्रमुख आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते. तर या 72 तासांच्या कालावधीत 18 वरीष्ठ अधिका:यांचे  आदेश  काढण्यात आल्या असून त्यांना तीन शिफ्टमध्ये कंट्रोल रुममध्ये 24 तास हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

Contact Now

https://manvadhikarabhivyakti.com/wp-content/uploads/2018/05/img_20180528_164636.jpg

तसेच या कालावधीत सर्व अधिका-यांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या असून त्यांनी या काळात मुख्यालय सोडू नये असे आदेशही त्यांनी दिले आहेत. या कालावधीत आपत्तीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवतांनाच, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंते, स्वच्छता निरिक्षक यांना देण्यात आलेल्या जबाबदा-या काटेकोरपणे  पाळाव्यात असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
शहरात ज्या सखल भागात पाणी साचते त्या ठिकाणी लोखंडे पोल टाकून रस्सी बांधण्यात यावी जेणे करुन, एखादी घटना घडून त्याठिकाणी कोणी अडकले तर त्याला व्यवस्थितपणे सुरक्षित स्थळी हलविण्यात येऊ शकेल. वेळ पडल्यास सखल भागातील रहिवाशांचे स्थलांतर करण्याच्या सुचना देखील त्यांनी केल्या आहेत. त्याचबरोबर स्थावर मालमत्ता विभागाने महापालिकेच्या रिकाम्या  मालमत्तांचा शोध  घ्यावा तसेच महापालिका शाळा आणि वेळ पडल्यास लग्नाचे हॉलही आरक्षित करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिका-यांना दिल्या.

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »