29 C
Mumbai
Friday, May 3, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

पाच गायब शाळकरी मुली कुलाबा पोलिसांना कुर्ला रेल्वे स्थानकावर सापडल्या। —- रिपोर्ट – डॉ. बीनू वर्गिस

मुंबई :- कुलाब्यातून शाळा सुटल्यानंतर घरी न परतलेल्या पाच शाळकरी मुली कुलाबा पोलिसांना काल कुर्ला रेल्वे स्थानकावर सापडल्या आहे. एका कफ परेडच्या पोलीस कॉन्स्टेबल आणि त्याच्या नातेवाईकाला भटकत असलेल्या मुली दिसल्या होत्या आणि त्याच आधारावर पोलिसांनी या हरवलेल्या पाच मुलींना शोधून काढले आहे अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी दिली. दोन दिवसा पासून गायब असलेल्या या मुलींनी टॅक्सी आणि रेल्वेने प्रवास करत शाळेतून सुटल्यानंतर मारिन लाइन्स ते हँगिंग गार्डन आणि नंतर दादर ते ठाणे आणि ठाणे ते दादर असा प्रवास केल्याचे तपासात उघड झाले आहे. पुन्हा आज या मुली कुर्ला रेल्वे स्थानकावर पोलिसांना शोध घेत असताना सापडल्या आहे.

https://manvadhikarabhivyakti.com/wp-content/uploads/2018/06/img_20180529_134443.jpg

आठवी इयत्तेत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी दोन दिवसा पूर्वी दुपारपासून बेपत्ता झाल्या होत्या. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. कुलाबा पोलिसांकडून बेपत्ता मुलींचा शोध सुरु केला. फोर्ट कॉन्व्हेट स्कूल कुलाबा येथे या ५ ही विद्यार्थिनी शिकतात. दोन दिवसा पूर्वी या विद्यार्थिनींचा ओपन डे म्हणजे परीक्षेचा निकाल होता. या विद्यार्थिनींना परिक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्या नाराज होत्या. दुपारी २. ३० वाजताच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर या मुली घरी न जात मरीन ड्राईव्ह येथे बसल्या होत्या. त्यानंतर त्या हँगिंग गार्डन, दादर, ठाणे आणि नंतर पुन्हा दादर अशा भटकत होत्या. मात्र, शाळेतून सुटलेल्या मुली घरी न परतल्याने धास्तावलेल्या पालकांनी कुलाबा पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली होती.

https://manvadhikarabhivyakti.com/wp-content/uploads/2018/05/img_20180528_164636.jpg

Contact Now

9004761777, 7977643978, 8850736386

OR E-mail – rohinee.enterprises@gmail.com

पोलिसांनी देखील त्यांची पथके इतरत्र पाठवून हरवलेल्या मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान कप परेडच्या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या मदतीने आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून या मुली कुर्ला रेल्वे स्थानकात सापडल्या. या मुलींकडे मोबाइल नसल्याने या मुलींचा शोध घेणं पोलिसांना खूप अवघड होत. मात्र, या पाच मुलींना फिरताना कफपरेडच्या एका कॉन्स्टेबलने त्याच्या नातेवाईकासोबत असताना पाहिले होते आणि याचमुळे पोलिसांना महत्वाचा धागा सापडला. त्यामुळे पोलिसांना हरवलेल्या मुली कुर्ला रेल्वे स्थानकावर बसल्या असताना काल सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास सापडल्या.

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »