29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024

आपका भरोसा ही, हमारी विश्वसनीयता !

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांच्या मुंबईतील भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

— मानवाधिकार अभिव्यक्ति

• गेल्या १३ वर्षात पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले, त्यात तुम्ही सगळ्यांनी मला निर्व्याज साथ दिलीत, ह्या बद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन.

• मी गेल्या कित्येक दिवसात पत्रकारांना भेटलोच नाही तरीही तेच ठरवतात की मी म्हणे लोकसभेच्या २ जागा मागितल्या, २ जागा मागितल्या. लोकसभा निवडणुकीबाबत माझ्या पक्षांतर्गत चर्चा सुरु आहेत. आचारसंहिता लागली कि माझा निर्णय जाहीर करेन. जो निर्णय घेईन तो राष्ट्र आणि महाराष्ट्रहिताचा असेल, माझ्या महाराष्ट्र सैनिकांच्या हिताचा असेल.

• लोकांची स्मरणशक्ती कमी असते, अगदी वर्तमानपत्रातील लोकांना देखील आठवड्यापूर्वी काय घडलं हे आठवत नसतं. लोकांनी विसरून जावं हीच भाजप सरकारची इच्छा आहे म्हणून त्यांनी काय काय करून ठेवलंय, ह्याची आठवण करून द्यायची आहे.

• मी कोल्हापूरला जे बोललो त्यावर भारतीय जनता पक्षाच्या फुलबाज्या फुटत होत्या. नरेंद्र मोदींच्या आयटी सेलमधली लावारीस कार्टी वाट्टेल ते पसरवत होती.

• अनेक रिकामटेकडे युद्ध झालं पाहिजे, पाकिस्तान मध्ये घुसलं पाहिजे अशा गप्पा सुरु करत असतात, पण हे बोलणारे दिवाळीत बाजूला फटाका फुटला तरी घाबरतात आणि निघाले युद्धाच्या गप्पा करायला!

• अजित डोवल कोण आहेत, हे राज ठाकरेंना माहित आहे का असं लोकं विचारतात. हो मला माहित आहे. पाकिस्तानी नागरिकांशी व्यवसायात भागीदारी करणाऱ्या विवेक डोवाल ह्याचे वडील. अजित डोवालची मुलं पाकिस्तनी पार्टनर आहे, अरब पार्टनर आहे. हि भागीदारी चालते का भाजपला? हा देशद्रोह नाही?

• नरेंद्र मोदी आणि त्यांचे भारतीय जनता पार्टी ठरवणार की राष्ट्रभक्त कोण ते? तुम्हाला कोणी अधिकार दिला हे ठरवण्याचा? नरेंद्र मोदी थोर राष्ट्रभक्त ना, मग नवाझ शरीफला त्याच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेले?

• २७ डिसेंबर २०१७ अजित डोवाल आणि पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे थायलंडला भेटले. काय झालं ह्या बैठकीत?

• पुलवामा येथील हल्ल्यात आपले ४० जवान मारले गेले आणि आम्ही तरीही प्रश्न नाही विचारायचे, ही कसली दडपशाही?

• २०१५ ला कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या आधी मी बोललो होतो की हे युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. मी ज्योतिषी नाही पण भाजप काय काय करू शकते ह्याचा मला अंदाज आहे. पाडव्याच्या सभेत बोललो कि राम मंदिराचा विषय पुढे आणतील त्यानंतर राम मंदिरावरून तणाव निर्माण करायचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न फसला.

• पुलवामा येथे जे घडलं त्याची पूर्वसूचना गुप्तचर विभागाने दिली होती पण तरीही त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. जर पूर्वसूचना मिळून देखील काही कारवाई होत नसेल आणि आमचे जवान हकनाक मारले जाणार असतील तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हे जबाबदार नाहीत का?

• पुलवामा नंतर मोदी हसत-खेळत शांतता पुरस्कार घ्यायला गेले होते. नोटबंदी केल्या केल्या जपानमध्ये जाऊन कशी भारतीयांची वाट लावली हे सांगणारं भाषण करून आले.

• सैन्याचं एक वैशिष्ट्य आहे की सैन्याला दिलेलं काम ते शांतपणे आणि चोखपणे करून येतात. सैनिक लढाई जिंकतात किंवा हरतात, ते फक्त योग्य माहितीच्या आधारावर. भारतीय हवाई दलाने त्यांचं काम उत्कृष्टपणे पूर्ण केलं.

• आपल्या सैन्याने त्यांना पुरविलेल्या माहितीनुसार लक्ष्य भेदलं. पण सैन्याला दिली गेलेली माहिती चुकीची होती.

• मोदी म्हणतात, राफेल विमान असतं तर सैनिक मारले गेले नसते म्हणजे ज्या वैमानिकांनी धाडसाने बालाकोट हवाई हल्ले केले, त्या वैमानिकांच्या कर्तृत्वावर शंका घेतायत. असं राफेल घ्या किंवा घेऊ नका, पण अनिल अंबानींच्या कंपनीला राफेलचं कंत्राट का दिलं ह्याचं उत्तर द्या?

• काँग्रेसच्या काळात राफेलची किंमत जितकी होती त्यापेक्षा आत्ता जास्त का आहे? काँग्रेसच्या काळात फक्त राफेलचा सांगाडा विकत घेणार होते आणि मोदींनी इंजिन बसवायला घेतलं म्हणून किंमत वाढली का?

• मोदी म्हणाले होते सीमेवरच्या सैन्यापेक्षा व्यापारी जास्त शूर आणि धाडसी असतो. हे बोलताना मोदींना लाज नाही वाटत? व्यापारी व्यापाराचं काम करतो पण देशाचा पंतप्रधान सैन्याच्या शौर्याची कुणाशीही तुलना कशी करू शकतो? हेच ह्यांचं खरं रूप आहे.

• राफेल व्यवहाराची कागदपत्र चोरीला जात आहेत, आधी सरकार मान्य करतं की चोरीला गेले, आणि आता म्हणाले नक्कल प्रत चोरीला गेली. काय गोंधळ माजवलाय देशात आणि हिंदू वर्तमानपत्राच्या एन राम हे रोज त्या कागदपत्रातून गौप्यस्फोट करत आहेत म्हणजे त्यांनीच चोरली, आज त्यांच्यावर चोरीचा आळ घेत आहेत.

• भारतीय जनता पक्षाचं नशीब बघा, आज त्यांच्यावर ‘राम’ आणि ‘हिंदू’ उलटला.

• २५ डिसेंबर २०१५ ला मोदींनी नवाझ शरीफ ह्यांना पाकिस्तानात जाऊन केक भरवला आणि पुढे ७ दिवसांत पठाणकोट हवाई तळावर हल्ला झाला. पुढे ३ महिन्यात ४ राज्यांच्या निवडणुका झाल्या.

• उरी हल्ल्यानंतर उत्तराखंड, उत्तरप्रदेशच्या निवडणुका झाल्या, गुरुदासपूर हल्ल्यानंतर १० दिवसात दिल्ली निवडणुका झाल्या.

• डोकलाम येथील तणावानंतर भारतीय जनता पक्षाच्या फुलबाज्या ओरडत होत्या की चायनीज माल बंद करा. मग सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा चीनमधून का बनून आला? आम्हाला कळू तर दे देशद्रोही घरात आहेत का बाहेर? आणि हे ठरवणार देशप्रेमी कोण आणि देशद्रोही कोण ते?

• ट्रोल करताना जर नीट टीका केली तर ठीक आहे पण उगाच शिव्या द्यायला लागले तर ट्रोलिंग करणाऱ्यांना घराबाहेर काढून मारा.

• मी आज एक गोष्टीची भीती व्यक्त करतोय, की निवडणुकीच्या मध्यात पुन्हा निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा सारखा हल्ला घडवला जाईल.

• कारण नोटबंदी फसली. वस्तू व सेवा कर गोंधळ अजून सुरूच आहे ज्यामुळे व्यापारी देशोधडीला लागले. तरुण बेरोजगार आहेत. शेती आणि शेतकऱ्याची अवस्था बिकट आहे, महागाई प्रचंड आहे ह्या सर्व आघाड्यांवर मोदी सरकार संपूर्ण अपयशी म्हणून सैनिकांच्या शौर्याआड स्वतः अपयश लपविण्यासाठी आणि भारतीयांच्या देशभक्तीचा फायदा उचलण्यासाठी हे काहीही करू शकतात. तेव्हा सावध राहा.

Latest news

ना ही पक्ष ना ही विपक्ष, जनता के सवाल सबके समक्ष

spot_img
Related news

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Translate »